ऋषभ पंतच अपघातानंतर पहिलं टि्वट, करिअरबद्दल केलं मोठं वक्तव्य

0
46

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतच्या कारला मागच्यावर्षी भीषण अपघात झाला होता. दिल्लीवरुन रुडकी येथे जात असताना हा भीषण अपघात झाला होता.

अपघातानंतर ऋषभ पंतवर आधी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. त्यानंतर त्याला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. अपघातानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केलीय. सर्जरी यशस्वी झाली. पुढच्या आव्हानांसाठी मी तयार आहे, असं पंतने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. कठीण काळात साथ दिल्याबद्दल ऋषभ पंतने बीसीसीआय, फॅन्स, सरकारी अथॉरिटीचे आभार मानले. पंतला मैदानात लवकर पुनरागमन करायचं आहे.

ऋषभने टि्वटमध्ये काय म्हटलय?

‘सपोर्ट आणि शुभेच्छाबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझी सर्जरी यशस्वी झाली हे तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय. रिकव्हरी सुरु झालीय. मी पुढच्या आव्हानांसाठी सज्ज आहे. बीसीसीआय, जय शाह आणि सरकारी अथॉरिटीचे आभार’ असं ऋषभने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलय.

तुमच्या शब्दांनी मला धीर दिला

‘मी मनापासून माझे चाहते, संघातील सहकारी, डॉक्टर आणि फिजियो यांचे आभार मानतो. तुमच्या शब्दांनी मला धीर दिला. माझी हिम्मत वाढवली. तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी मी उत्सुक आहे’ असं ऋषभने त्याच्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटलय.

सहा आठवड्यानंतर आणखी एक शस्त्रक्रिया

ऋषभ पंतवर मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटमध्ये गुडघ्यावर लिगामेंट शस्त्रक्रिया झाली. आता सहा आठवड्यानंतर ऋषभवर आणखी एक सर्जरी होऊ शकते. ऋषभ आयपीएल, आशिया कप तसच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेला मुकू शकतो. लिगामेंट शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीसाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो.

हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही

ऋषभ पंतच या भीषण रस्ते अपघातातून वाचणं हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्याची कार डिवायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कारने पेट घेतला. पंत कसाबसा कारबाहेर पडण्यात यशस्वी ठरला. हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर सुशील कुमारने पंतची मदत केली. या बस ड्रायव्हर आणि कंडक्टरचा उत्तराखंड सरकारने नंतर सन्मान केला.

Spread the love