निंभोरा येथील छत्रपती संभाजी नगरमध्ये श्री शिव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

0
44

प्रतिनिधी – राजेंद्र महाले –

रावेर तालुक्यातील निंभोरा बु.येथील छत्रपती संभाजी नगर येथे श्री शिव मंदिर नवनिर्माण करण्यात येणार आहे.

मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण या निमित्त ३ दिवसीय भव्य पूजेचे आयोजन केलेले आहे. दि. १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी असे तीन दिवस होमहवन होणार असून, ३ फेब्रुवारी शुक्रवार या दिनी दुपारी १२ वाजेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा पूर्ण आहुती होऊन देव सिंहासनी बसविले जातील, त्यानंतर मंदिर समिती अध्यक्ष श्री ह.भ.प. सुभाष महाराज पाटील, निंभोरा बु|| (आळंदी) यांचे काल्याचे किर्तन होईल. तसेच ४ फेब्रुवारी २०२३ शनिवार या दिवशी ग्रामभोजन भंडारा महाप्रसाद होईल.

श्री.ह.भ.प. सुभाष महाराज पाटील (आळंदी शिक्षण संस्था) यांच्या समवेत खजिनदार व संपूर्ण समिती यांच्या अथक प्रयत्नातून नवनिर्माण मंदिराचे उभारणी होत असून भाविकांनी या सुवर्ण महायोगाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समिति तर्फे केले आहे.

Spread the love