ठाकरे- शिंदे सत्तासंघर्षावर सुनावणी : कार्यकारणीच्या निवडणुका घेण्यास परवानगी द्या- कपिल सिब्बल यांची मागणी

0
44
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालाची सुनावणी दिल्लीमध्ये निवडणुक आयोगासमोर आज सुरू असून या निकालाकडे महाराष्ट्राशिवाय संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहीले आहे. या सुनावणीसाठी शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांच्याबरोबर निहार ठाकरे  हे उपस्थित असून ठाकरे गटाकडून कडून कपिल सिब्बल  हे निवडणुक आयोगासमोर उपस्थित राहीले आहेत.

यावेळी प्रथम ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. यामध्ये त्यांनी राष्ट्रिय कार्यकारिणीला मुदतवाढ मागितली आहे. याशिवाय मुदतवाढ शक्य नसेल तर राष्ट्रिय़ कार्यकारणीच्या मिवडणुका घेण्यास परवानगी द्यावी अशीही मागणी केली आहे.

यावेळी युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांनी ही घटना ही घटना संसदीय व्यवस्थेची थट्टा असल्याचे म्हटले आहे. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची घटना निवडणुक आयोगासमोर सादर केली. तसेच शिवसेनेच्या घटनेशी तंतोतंत जुळणारी फक्त ठाकरे गटाची कार्यकारिणी आहे. असे त्यांनी दावा केला आहे. ठाकरे गटाची राष्ट्रिय़ कार्यकारणी कधीच बरखास्त होऊ शकत नाही.निवडणुक आयोगाने शिंदे गटाची शपथपत्रे आणि इतर कागदपत्रे तपासून पहावीत अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.

तसेच शिवसेना पक्षाची घटना शिंदे यांना मान्य नसेल तर शिंदे यांचे पक्षनेतेपद कसे पद ग्राह्य कसे धरता येईल असाही युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Spread the love