संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे दोन फोन

0
44

शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे.

बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन  आले. फोनवरून राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका  संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

संजय राऊतांना फोनवरून धमकी

शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई  यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीका केली होती. हे सरकार नामर्द असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. यानंतर राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवावं, नाहीतर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं शंभूराजे यांनी म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

 

Spread the love