आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंना बाजूला ढकललं; पाहा VIDEO

0
40

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलं आहे. आदित्य ठाकरे आणि नितेश राणेही यामध्ये आमनेसामने आले होते. आता त्यांचाच एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

हा व्हिडीओ नागपूर हिवाळी अधिवेशनातला विधान भवन परिसरात असल्याचं कळत आहे. यामध्ये नितेश राणे काही जणांसोबत बोलत उभे आहेत. मागून शिवसेना आमदारांसोबत आदित्य ठाकरे येत आहेत.

आदित्य ठाकरे पुढे येताच त्यांच्यासोबतच्या लोकांनी तसंच काही माध्यम प्रतिनिधींनी नितेश राणे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना बाजूला ढकलल्याचं या व्हिड़ीओत दिसत आहे. अनेक शिवसेना कार्यकर्त्यांकडून हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. ठाकरेंसमोर कोणीच मोठं नाही, असा आशय देऊन हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

 

Spread the love