आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच माणसे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
44

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमध्ये आलेले अनुभव सांगताना पंतप्रधानांवर स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले की, दावोसमध्ये प्रत्येकजण आपल्याला मोदींबद्दलच विचारत होता. मोदींचे कौतुक करीत होता. लक्झमबर्गचे पंतप्रधान मला भेटले तेव्हा त्यांनी मला आपण मोदींचा भक्त असल्याचे सांगितले. तिथे लोकांनी मला तुम्ही मोदींना मानता का, असे विचारल्यावर ‘आम्ही मोदींचीच माणसं’ असल्याचे मी सांगितल्याचे शिंदे म्हणाले.

 

Spread the love