मुख्यमंत्र्यांनी मला कानात सांगितले काँग्रेसवाले मला त्रास देतात’ : रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे

0
60

औरंगाबाद- : व्यासपीठावरील आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी… असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात भाषणाची सुरवात केली. यावरून राज्यात नवे राजकीय वळण आल्याचे बोलले जात आहे. यावेळी केंद्रीय रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्याबाबत मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे भर सभेत मला म्हणाले, काँग्रेसवाले मला त्रास देतात..तुम्ही एकत्र या आपण बसून बोलू आणि हे सांगताना व्यासपीठावर बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. त्यांनीही हे ऐकलं आणि तेही हसले, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या कामासाठी हे सरकार सोबत असल्याचे सांगत, रेल्वेचा मार्ग आधीच ठरलेला असतो. रूळ सोडून इंजिन इकडे-तिकडे कुठेही जावू शकत नाही. म्हणून मला रेल्वे आवडते. मध्ये डायव्हरशन पाहिजे तर आमच्या स्टेशनवर येवू शकता. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या जुन्या मित्राला साद घातली. शुक्रवारी (दि.17) झालेल्या जिल्हा परिषदच्या नूतन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

Spread the love