दिपक नेवे
केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजना तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत केंद्र व बुथप्रमुखांनी पोहोचवा. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणूका आपण सहज जिंकू असे आवाहन माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांनी आज येथे केले.
भाजपच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
येथील धनश्री चित्र मंदिरात हा मेळावा आज घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार गिरीष महाजन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार राजू मामा भोळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, संघटनमंत्री रवी अनासपुरे उपस्थित होते. प्रसंगी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सुरेश धनके, पद्माकर महाजन, मसाका अध्यक्ष शरद महाजन, नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, सचिन पानपाटील, जि.प. सदस्य तथा आरोग्य सभापती रविंद्र पाटील, जि.प. सदस्य सविता भालेराव, पं.स. सभापती पल्लवी चौधरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, पंचायत समिती गटनेता दीपक पाटील, लक्ष्मी मोरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, प्रदेश सदस्य मीना तडवी, नरेंद्र नारखेडे, रावेर तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, यावलचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी कोरोनाच्या काळात मागील एक वर्षात पक्षाचे माजीआमदार व माजी खासदार दिवगंत हरिभाऊ जावळे यांच्यासह दुदैवीरित्या मरण पावलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली . यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीष महाजन पुढे म्हणाले, की शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख हा पक्षाचा केंद्र प्रमुख असून कार्यकर्त्यांनी मैदानात उतरल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. पक्षात नेता निमित्त मात्र असतो. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष मोठा असतो. देशासाठी, राष्ट्रासाठी समर्पित जीवन जगणारे नेते फक्त भाजपात आहेत, इतर कोणत्याही पक्षात नाही. असे आमदार महाजन म्हणाले.
खासदार रक्षाताई खडसे म्हणाल्या, की केळीपीक विमा योजनेचे निकष शेतकरी विरोधात करून निव्वळ विमा कंपनीच्या फायद्यासाठी राज्यातील तिन पक्षाच्या आघाडी सरकारने बदलवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप केले आहे. या चुकीच्या निकषांसंदर्भात भाजपने तीव्र आंदोलन केल्यामुळेच राज्य सरकारला पुन्हा जुने निकष लावण्यास भाजपाने भाग पाडले आहे.
प्रसंगी आमदार राजू मामा भोळे यांचेही भाषण झाले. तर नंदकिशोर महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त २ आक्टोबरपर्यंत सलग सोळा दिवस पक्षातर्फे विविध कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहीती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा किसान मोर्चातर्फे निवृत्त सैनिक, व प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला.
प्रसंगी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष कांचन फालक, बाजार समिती उपसभापती उमेश पाटील, नितीन राणे, डॉ. नरेंद्र कोल्हे, भरत महाजन, हेमराज फेगडे, उमेश फेगडे, भाजपचे शहराध्यक्ष निलेश गडे, अतुल भालेराव, उज्जैनसिंग राजपूत, आदीवासी समाजाचे कार्यकर्ते सलीम तडवी सर , व्यंकटेश बारी,फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे, देविदास पाटील, किशोर कुलकर्णी, सागर कोळी, विद्या पाटील,सरला कवडीवाले, अनंत नेहेते आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी केले. सूत्रसंचालन भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले. तर आभार बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे यांनी मानले.












