चाळीसगाव (जळगाव) : वाघळी (ता. चाळीसगाव) येथील दोघे भाऊ दुपारी नदीत पोहायला गेले होते. पोहताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. यात त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
वाघळी (ता. चाळीसगाव) गावालगत असलेल्या तितुर नदीपात्रात कमळेश्वर के. टी. वेअरजवळ आज सायंकाळी पाचच्या सुमारास सदर घटना घडली. नदीत बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये साहिल शरीफ शहा (वय १४) व आयान शरीफ शहा (वय १७) या दोघे भाऊ आहेत. नदीत पोहच असताना त्यांना अंदाज आला नाही. यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. यातून त्यांना बाहेर निघता आले नाही. यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आयानचा मृतदेह मिळून आला. साहिल अद्यापही बेपत्ता असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.












