भुसावळ -: तालुक्यातील साक्री इथं नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या दोन मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकलून दिल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माथेफिरू तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तर दोन्ही मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र जोपर्यंत आरोपीला कठोर शिक्षा होणार नाही आणि आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतलीय.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींना विहिरीत ढकलणाऱ्या मुलानेच आपण दोघींना विहिरीत ढकललं असल्याचं गावकऱ्यांना सांगितलं. त्यानंतर संबंधित आरोपीला पोलिसांच्या हाती देण्यात आलं. शेवटी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर याबाबत खात्री झाली. नववीत शिकणाऱ्या मुली नेहमीप्रमाणे सकाळी ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास घरातून क्लासला निघाल्या होत्या. आदल्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
जोपर्यंत न्याय मिळणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं म्हणत ग्रामस्थ आक्रमक झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीला नेणारी रुग्णवाहिका ग्रामस्थांनी रोखून धरली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं म्हणत ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
साक्री गावात झालेला दुर्घटना संदर्भात रुग्णवाहिका आली असता संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकाला परत केले जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह इथून उचलू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. ग्रामस्थ आक्रमक झाल्यानं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर गावात पोलीस बंदोबस्त आणि आमचे अधिकारी व कर्मचारी तैनात झाले आहे









