सुनसगाव येथे बुध्द विहारात हायमस्ट लॅम्प ची दुरावस्था , लाईट लावण्याची मागणी !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे गावातील अनेक विज खांबावर लाईट नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तसेच येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील बुद्धविहारात असलेल्या हायमस्ट लॅम्प खांबावरील लाईट बंद पडलेले असल्याने या बुध्द विहाराच्या प्रांगणात अंधार असतो त्यामुळे लवकरात लवकर बुद्ध विहारात हायमस्ट लॅम्प खांबावरील लाईट दुरुस्ती करण्यात यावेत अन्यथा या ठिकाणी लाईट बसविण्यात यावेत तसेच आता गणेशोत्सव व नवरात्रौत्सव येणार असल्याने गावातील खांबावर लवकरात लवकर लाईट लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Spread the love