पुणे, 2 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेवरुन मोठा राजकीय वाद उफाळला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत उल्लेख केला.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन 4 तारखेपासून ऐकून घेणार नाही, अशी भूमिका मांडली. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडी आणि काही संघटनांकडून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी तर राज ठाकरे यांच्या भाषणावरुन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
“राज ठाकरे जातीवादाचं राजकारण करत आहेत. त्यांना अटक करुन शांतता प्रस्थापित करा. आम्ही या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे खोटा इतिहास पसरवत आहेत.
त्यामुळे त्यांना अटक करा”, अशी भूमिका प्रवीण गायकवाड यांनी मांडली आहे. (‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा’, अबू आझमींची राज ठाकरेंवर टोकाची टीका) “जेम्स लेन यांचं मूळ पुस्तक आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं पुस्तक यातील शिवाजी महाराज जन्म आणि दादोजी कोंडदेव यांच्याबाबत केलेलं लिखाण सारखं आहे. नंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाच्या कॉपी आलेली आहे. त्यात मग दादोजी कोंडदेव यांच्याबाबत लिहिलेलं लिखाण का वगळलं?”, असा सवाल प्रवीण गायकवाडांनी केला.
राज्याचं गृहविभाग राज ठाकरेंवर कारवाई करणार? दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह विभाग अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर संवेदनशील भागांसाठी विशेष सूचना गृह मंत्रालयाकडून करण्यात येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले.
तर राज्यात पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल’, राजेश टोपेंचा स्पष्ट इशारा) औरंगाबादचे पोलिस आयुक्त राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास करत आहेत. पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर मत घेऊन काय कारवाई करायची हे ठरवले जाईल.
कुठल्याही घटना घडू नये यासाठी आम्ही तयारीत आहोत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या मुंबईला बैठक बोलावली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन कोणीही करून चालणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सक्षम असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.










