कोण होणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? पदासाठी ‘ही’ नावं आहेत चर्चेत..

0
44

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. यात त्यांनी ‘उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतील करु इच्छितो.

त्यामुळे आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, असे म्हटले आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. मात्र, आता भगतसिंह कोश्यारी यांच्या नंतर महाराष्ट्राला नवे राज्यपाल कोण लाभणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले असताना अश्यात काही महत्वाची नावे समोर आली आहेत.

यामध्ये पहिले नाव आहे ‘ओमप्रकाश माथूर’ त्यानंतर ‘कॅप्टन अमरिंदर सिं’ह आणि ‘सुमित्रा महाजन’ अशी तीन नावं सध्या जोरदार चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. ओमप्रकाश माथूर भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचे प्रभारी आणि ते भाजपचे सरचिटणीस या पदावरही ते राहिले आहेत.

तर सुमित्रा महाजन यांनी देखील नकळत आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. पक्षाने आपल्या पालक म्हणून महाराष्ट्रात पाठवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राहणार की जाणार हे आता येणारा काळच ठरवणार असून, त्यांची जागा कोण चालवणार हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे आहे.

 

Spread the love