जळगाव ( प्रतिनिधी ) – महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांची कारण आणि गरज नसताना प्रदेश चिटणीस म्हणून नियुक्ती म्हणजे त्यांना अप्रत्यक्ष रीतीने महानगराध्यक्षपद सोडण्यास सांगण्यासारखे आहे, अशा नाराजीच्या भावनेतून आज राष्ट्रवादीच्या शहरातील १२ आघाड्यांच्या अध्यक्षांसह ३०० पेक्षा जास्त कार्यकारिणी सदस्यांनी राजीनामे दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे राजीनामे देणाऱ्या या सर्व पदाधिकार्यांच्या भूमिकेचे समर्थन करीत आता आमच काय चुकल तेवढ सांगा अशी भूमिका अभिषेक पाटील यांनी घेतली आहे.
अचानक अभिषेक पाटील यांची प्रदेश चिटणीस म्हणून नियुक्ती या राजीनामे देणाऱ्या पदाधिकार्यांना खटकलेली आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली एक व्यक्ती २ पदांवर राहू शकत नाही म्हणून अभिषेक पाटील यांना महानगराध्यक्ष पद सोडावे लागले असते असे या पदाधिकार्यांना वाटते राजीनामे देणार्यांमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पना पाटील , युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे , सामाजिक न्याय अध्यक्ष जितेंद्र चांगरे , पदवीधर अध्यक्ष अनिल पाटील , सचिव आड कुणाल पवार , युवक कार्याध्यक्ष तुषार इंगळे , विद्यार्थी कार्याध्यक्ष अक्षय वंजारी , युवती अध्यक्ष आरोही नेवे , वक्ता सेल अध्यक्ष रमेश भोले , सांस्कृतिक अध्यक्ष गौरव लावंगले , ओबीसी सेल अध्यक्ष कौशल काकर , शिक्षक आघाडी अध्यक्ष हेमंत सोनार यांचा समावेश आहे .
अभिषेक पाटील यांची महानगराध्यक्ष पदावर १६ जानेवारी २०२० रोजी नियुक्ती झाली होती. त्यांना १७ महिन्यांचा कार्यकाळ आतापर्यंत मिळाला त्यातही कोरोना लॉकडाऊनचा प्रदीर्घ काळ गेला या काळात विविध मुद्द्यांवर ७२ आंदोलने शहरात राष्ट्रवादीने केली या आंदोलनांचे नेतृत्व करीत पुढाकार पदराला खार लावून अभिषेक पाटील यांनी घेतला शहरात रेशांकार्डांचे वाटप , दीड लाख लोकांना आयुष्यमान कार्डांचे वाटप अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन आणि नियोजन अभिषेक पाटील यांनी केले. शहरात यांनी सक्रीय कार्यकर्ते तयार केले शहरातील ७५ पैकी ३७ वार्डात पक्षाच्या शाखा उघडल्या गेल्या आता आम्ही चुकलो कुठे एवढे सांगा असा आमचा प्रश्न आहे असे अभिषेक पाटील यांनी सांगितले आता मला शहर मतदारसंघात वेळ द्यायचा आहे म्हणून मला प्रदेश चिटणीस पद देऊन राज्य स्तरावर अडकवून ठेऊ नका असे मी पक्षाच्या नेत्यांना सांगणार आहे असेही ते म्हणाले काही नेते त्यांच्या समर्थकांना पदे मिळावी म्हणून दबाव टाकत आहेत ही त्यांची भूमिका असू शकेल पण मला त्याबद्दल काही बोलायचे नाही मी कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करीत राहीन असेही ते म्हणाले.
- आपल्याच नेत्यांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळे पूर्ण क्षमतेने काम करू शकत नसल्याची खंत व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महानगर पदावरून कार्यमुक्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांना पत्र दिले आहे. अभिषेक पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जळगाव शहर विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर गेल्या १७ महिन्यात मी स्थानिक नेत्यांकडून खूप काही शिकलो. मी निरपेक्षपणे व निर्भीडपणे पक्षाचे काम केले. आता मला स्वतः पक्षाचे तळागाळात काम करायचे आहे. मला पक्षाच्या महानगराध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करावे, मी इमाने इतबारे कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करेल असे पत्रात म्हटले आहे.












