येथून जवळच असलेल्या चिनावल येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
त्यात ब्रम्हाकुमारी मंगला दीदींनी रक्षाबंधन चे महत्व सांगितले. रक्षा बंधन स्नेहाचा प्रतीक आहे बहिण भाऊला राखी बांधते आणि कामना करते की भाऊ तिची रक्षा करेल पण वास्तविक तर आज रक्षा ची सर्वांनाच आवश्यकता आहे असे विचार बुऱ्हाणपूर येथून आलेल्या ब्रम्हाकुमारी मंगलादीदी यांनी व्यक्त केले त्यांच्यासोबत ब्रम्हाकुमारी हिरा दीदी व ग्रामपंचायत सरपंच भावना बोरोले, डॉ जयंत पाटील , चंद्रकांत भंगाळे, निंभोरा येथील प्रल्हाद भाऊ बोंडे ,माजी सरपंच डिगंबर दादा चौधरी,सुनिल भाऊ कोंडे,ललित भाऊ कोळंबे यांची उपस्थिती होती.तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात अन्य महिला व पुरुष उपस्थित होते सर्वांनी रक्षा सूत्र बांधले आणि हा कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला.










