बंडखोरांना मिळाले काय ? बाबाजी का ठुल्लू ! आदित्य ठाकरेंची तुफान फटकेबाजी

0
45

कालच दहीहंडी होऊन गेली त्या दहीहंडीत राज्याच्या तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांनी 50 थर लावले होते. ते 50 थर होते की 50 वेगळं काही होतं. त्यांनी सांगितलं की त्यांनी हंडी फोडली. पण जे जे गद्दार त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यांना मला विचारायचं आहे की हंडी फोडली त्यांनी मलाई खाल्ली त्यांनी मग तुम्हाला काय मिळालं? 40 बंडखोरांना चांगली खाती मिळतील असे सांगण्यात आले होते परंतु मिळाले काय बाबाजीका ठुल्लू! असा घणाघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर केला. शिवसंवाद यात्रे निमित्त शनिवारी जळगाव मधील पाचोऱ्यात आदित्य ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की शिवसंवाद दौऱ्यात लोकांचं मोठ्या प्रमाणात प्रेम मिळालं. हे प्रेम शिवसेनेसाठी, भगव्या झेंड्यासाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी आहे. लोकांचे मिळणारे हे प्रेम त्या गद्दारांनी इथे येऊन पहावं. 50 खोक्यांच्या आमिषाला बळी पडणं सोपं असतं. परंतु एका पक्षाशी एकनिष्ठ राहणं हे म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर कठीण असतं. दौऱ्यांमध्ये लोकांचे मिळणारे प्रेम लक्षात घेता येणार काळ हा शिवसेनेचाच असणार आहे. जळगावमध्ये आल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, दुकानदार, शाळकरी मुलं या सर्वांनी माझे स्वागत केले. अनेक ठिकाणी माझ्या स्वागतासाठी मोठे हार आणण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रात आलेली पूरपरिस्थिती लक्षात घेता मला ते हार स्वीकारणे पटले नाही.

पहिली गद्दारांनी बॅच गेली त्या पैकी किती जणांना मंत्री पद मिळाले? आपल्याकडे यांना चांगलं मंत्रीपद दिलं होतं, तिकडे जाऊन काय मिळालं? हीच त्यांची लायकी होती. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. गद्दार जरी बिकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे. त्यांना ठाऊक आहे कोण विकासकामं करतं, खरं बोलतं, आणि कोण खोटं बोलतं. या देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही असते खडे बोल ठाकरे यांनी बंडखोरांना सुनावले.

ज्यांना इतकी वर्षे आपण सगळ्यांनी प्रेम दिलं. त्यांचा प्रचार केला, त्यांना मत दिलं त्यांनीच पक्षासोबत गद्दारी केली. मात्र जे इतकी वर्षे आपल्यासोबत नव्हते ते या कठीण काळात आज आपल्यासोबत आहेत. राज्यात सुरु असणारे राजकारण हे शिवसेनेला संपवण्याचे राजकारण सुरु आहे. उद्या यांची राज्यात एकहाती सत्ता आली तर हे महाराष्ट्राचे 5 तुकडे पाडतील. मला सत्ता गेल्याचं दुःख नाही कारण तुम्ही शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा आणणार आहात याची मला खात्री आहे. पण जो महाराष्ट्र आपण पुढे नेत होतो तो महाराष्ट्र हे मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. या गोष्टीचं दुःख आहे. असे ते म्हणाले.

गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली, रोजगार दिले, शिक्षण व आरोग्याच्या बाबतीत राज्य पुढे नेले. कोरोनाकाळात सर्वांना आधार दिला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्राला पुढे घेऊन चालले आहेत हेच त्या गद्दारांच्या पोटदुखीचे कारण असेल. सरकारने पहिलाच निर्णय घेत रायगड किल्ल्यासाठी 600 कोटींचा निधी दिला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. शेवटचा निर्णय देखील संभाजीनगर आणि धाराशिव हे नामांतर करण्याचा घेतला. आपलं हिंदुत्व हे इतरांपेक्षा वेगळं आहे. अडीच वर्षात कुठेही धार्मिक व जातीय तणाव निर्माण झाला नाही. असे ते म्हणले.

40 गद्दार जिथे तिथे जाऊन आम्ही क्रांती केली, उठाव केला असे बोलतात. परंतु क्रांती आणि उठाव करण्यासाठी हिम्मत लागते. परंतु हे लोक गद्दार आणि डरपोक आहेत. हे गद्दार गुजरात ला गेल्यावर तेथील हलताना व डुलतानाचे व्हिडिओ सर्वांनी पाहिले. तेथून ते गुवाहाटीला गेले आणि राज्याची लाज काढली. स्वतःला शिवसैनिक म्हणवून त्यांची मजा मस्ती आणि धांगडधिंगा सुरु होता. पण त्यांना आसाम मधला पूर दिसला नाही. त्यामुळे हे लोकप्रतिनिधी नाहीत. हे जर खरे बाळासाहेबांचे शिवासिनीक असते तर त्यांनी तिथे पुरात उतरून लोकांना मदत केली असती. असा घणाघात ठाकरे यांनी केला.

आजही राज्यात पूरपरिस्थिती आहे, शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आहे, महिलांवर अन्याय होत आहेत. मात्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. हे सरकारच बेकायदेशीर असल्याने ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बांगला सोडल्यावर हे गद्दार बार मध्ये नाचत असल्याप्रमाणे टेबलवर चढून हातवारे करत नाचले. हे नाचणारे लोक लोकप्रतिनिधी होऊ शकत नाहीत. या 40 गद्दारांची सामाजिक ओळख आणि राजकीय जन्म उद्धव ठाकरेंमुळे झाला आहे. उद्धव ठाकरे आजारपणात देखील सर्व अधिकाऱ्यांसोबत संपर्कात असायचे. ज्या काळात आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या मागे उभे रहायला हवे होते त्यावेळी त्यांनी पक्ष फोडला आणि खोके कसे मिळतील ते पाहिले. यांची गद्दारी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. असे ते म्हणाले.

Spread the love