अबब…आदिवासी भाग रामपुरा समस्यांच्या विळख्यात…. मुलभूत गरजापासुन लांबच लांब… अस्वच्छतेमुळे आरोग्य देखील धोक्यात दिसुन येत आहे… काय तर रामपुरा भागातील स्मशानभूमी राज्यात माँडेल…स्थानिक लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष…रणजित बागुल.
चोपडा : चोपडा नगरपालिका हद्दीमध्ये रामपुरा आदिवासी भाग येथे नविन बांधण्यात आलेल्या राज्य माँडेल ठरणारी स्मशानभूमी गेले दोन महिने उद्धाटन होऊन झालेत. द्वारपासुनच संपूर्ण रस्ता स्वच्छतेपासुन वंचित राहत आहे तसेच त्या परिसरात घानीचे साम्राज्य हे जनतेच्या आरोग्याशी खेळणारा आहे.तसेच पवित्र धार्मिक स्थळ असलेले महेबुबसुहानी बाबा दर्गा परिसरात घाण पाणी रस्त्यावर उतरले असुन, नगरपालिका तर्फे बांधण्यात आलेल्या महिला सार्वजनिक संडास कडे जात असताना कसरत करावी लागते काटेरी झुडपे,रस्त्यावर आलेले दुषित पाणी, परिसरातील कचऱ्यामुळे आरोग्य हाणीकारक आहे. रणजित बागुल यांच्या घराच्या मागील बाजू ते रोहिदास भिल यांच्या घरापर्यंत घाण पाण्याचे रुपांतर तलवात झाले आहे. वेळो वेळी मागणी स्थानिक नागरिकांनी रस्ता, गटार,कचरा,या संबंधित न पा नगरसेवकाला माहिती देऊन ही..देखा अनदेखा पण करत आहे.गटारी नसल्याने कारणाने दुषित पाणी सर्वत्र पसरल्याने असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.तसेच त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आधीच पूर्ण देश कोरोनाच्या संकटातून सावरत असतांना, सध्या डेंग्यू सारख्या आजाराने तोंड वर काढले असतानांच स्थानिक नगरपालिका यावर ठोस उपाय योजन करणे गरजेचे आहे.तसेच भागातील सार्वजनिक मुतारीमध्ये कचरा,कँरिबँग,खाली देशी बाटल्या,आतील स्लॅब पडलेला असवस्थेत दिसुन येत,परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. राम मंदिर जवळ पुरुष सार्जनिक संडास असुन ती देखील काही काळ पाणी पण नसते संडास हि अस्वच्छ व सफाई कर्मचारी साफसफाई वेळेवर करत नसुन निदर्शनास आले.व याबाबत देखील तीच अवस्था आहे. अस्वच्छता जास्त दिसुन येत आहे. करीत नसल्याने कचऱ्याची दुर्गंधी येते.यावर स्थानिक प्रशासनाने त्वरित काळजीपूर्वक लक्ष देवून त्या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी.तसेच पुन्हा त्या ठिकाणी घाण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.











