जळगाव जिल्ह्या सह संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यामधील ठीक ठिकाणी प्रांत अधिकारी यांना आयटीआयच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले मथुरा ( उत्तर प्रदेश J येथून दिनांक २६/१०/२०२१ पासून दिल्ली येथे पदयात्रा काढून दिल्ली येथील जंतर मंतर येथे दिनांक १/११/२०२१ रोजी भव्य मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त प्रलंबित मागण्यांसाठी तसेच दिल्ली येथील मोर्चे बाबत फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास गडलग यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना विषाणुसंसर्गाच्या महामारीच्या कारण देऊन शासनाने थर्ड शिफ्ट बंद करून तसेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा लांबणीवर टाकून शैक्षणिक नुकसान केले आहे.
त्याचप्रमाणे आयटीआय तील शिकणारा विद्यार्थी हा श्रमिक कामगार होणार आहे. मात्र शासनाने त्यांच्यावर ऑनलाइन परीक्षेचा मोठा बोजा टाकून दूर वरील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पाठवून आर्थिक भुर्दंड देण्यात येत असुन तर तसेच दुसरीकडे मात्र उच्चशिक्षित परीक्षा या ऑफलाईन स्वरूपाच्या होत असल्याच्या दिसुन येत आहे.
आयटीआयच्या विद्यार्थ्यां वरच शासन हे अन्याय करीत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रांत कार्यालयावर फैजपूर येथील सुभाष चौक पासुन तर प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढुण प्रांत अधिकाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातुन अध्यक्ष पी ई पाटील सर, टि. के. धांडे, एम एस चौधरी, आयटीआय चे निर्देशक पराग बेंडाळे, भूषण धांडे, बऱ्हाटे सर, राजू इंगळे, सरजू होले, संदीप चौधरी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित निवेदन देऊन आयटीआयच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा तसेच आमचे म्हणणे शासनापर्यंत पोचवावे अशी आर्त हाक ह्या वेळेस देण्यात आली. तसेच दिनांक १/११/२०२१ रोजी दिल्लीवरील मोर्च्याची कल्पना दिली.











