जळगाव – सर्वसामान्य माणसांचा आवाज होता आले म्हणजेच तुम्हाला समाजभान येणं होय.यासाठी कवीच्या,सहित्यीकाच्या आवाजाला बळ दिले पाहिजे हे बाळ देणे म्हणजे स्वतःला बळ देणे होय. मानवतावाद हीच लेखनाची मुख्य भूमिका असली पाहिजे कविता ज्योत असते जी आपल्या समाज विचाराला प्रकाशमान करते, कवितेचे बोट सोडल्याने व्यवस्था कोलमडली गेली असल्याचे वास्तव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक संजय आवटे यांनी केले.

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात रविवारी (12 जून) सायंकाळी आयोजित लेखक,कवी विनोद अहिरे लिखित, अथर्व पब्लिकेशन प्रकाशित हुंकार वेदनेचा या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कवितेकडे पाहताना सौंदर्यशास्त्राचे, समीक्षाशास्त्राचे निकष बदलावे लागतील. आता कवीचे भय वाटते. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे लोक आवडत नाहीत. सगळ्यात धोकादायक विचार असतो. विचार अनुयायांना कळणे महत्त्वाचे आहे. नव्या भूमिका मांडणार्यांना बळ दिले पाहिजे. आता विचार आणि कृतीची फारकत झाली आहे. कवी विनोद अहिरेंची कविता जगण्यातली, पहार्यातली आणि वास्तवातली कविता आहे. त्या कवितेत खर्या अर्थाने सृजनशीलता आहे. वेदनेची उकल कवीने मांडलेली असल्याचे देखील त्यांनी मांडले.याप्रसंगी साहित्यिक डॉ.मिलिंद बागूल म्हणाले की, हुंकार वेदनेचा हा कवितासंग्रह वेदनेचे ऊर्जेतील रूपांतरित झालेला नव्या पिढीचा आशावाद आहे. या आशावादातून जगण्यासाठी आणि जीवनासाठी शब्दच माणसाला जवळ घेतात आणि दूरही करतात हे लक्षात येते अशावेळी माणसाने ठरवायचे असते की, शब्दांच्या जवळ जाणे , जगणे त्यासोबतच समाजभान जपणे म्हणजेच जीवनाची वाटचाल समृद्ध करणे होय हेच साहित्याचे विश्व असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.याप्रसंगी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.गोपी सोरडे यांचा संजय आवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
महापौर जयश्री महाजन अध्यक्षस्थानी होत्या. विचारमंचवर सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा साहित्यिक व कवी डॉ. मिलिंद बागूल, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपमहापौर कुलभूषण पाटील, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गोपी सोरडे, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, ज्येष विधिज्ञ राजेश झाल्टे, विकास यावलकर, लेखक विनोद अहिरे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सपकाळे, माधुरी अहिरे, पितांबर अहिरे, मायाबाई अहिरे आदी उपस्थित होते. बापू पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी आभार मानले. विकास यावलकर यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी मुकुंद सपकाळे, कुलभूषण पाटील, महापौर जयश्री महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. लेखक विनोद अहिरे यांनी पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मंगल पाटील, प्रा. गणपत धुमाळ, डी. एम. अडकमोल, प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर, कवी गोविंद पाटील, प्रा.डॉ. सी.पी. लभाणे ज्येष्ठ पत्रकार अनिल केर्हाळे, दीपक महाले, शिवलाल बारी आदींसह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











