चोपडा : राज्यात शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना अंदाजे दिली जाणारी वीज बिलांच्या आधारे खोटी वीज बिल देवून शेतकऱ्यांना बदनाम करून सुरू असलेली वसुली थांबवावी व जुन्या सावकारी कायद्यासारखे ऊस बीलातून परस्पर वसुलीचे आदेश सरकारने काढलेत व आज साखर आयुक्त त्यासाठी चार वाजता बैठक देखील घेत आहेत,त्याच्या निषेधार्थ आज चोपडा येथे साऱ्या शेतकरी संघटना व सारे राजकीय पक्ष यांचे वतीने रास्ता रोको करण्यात आले यावेळी संजय बोरसे,आत्माराम म्हालके,संदीप पाटील, प्रा प्रदीप पाटील,अमृत महाजन,एस बी पाटील यांची समयोचीत मार्गदर्शन झाले व साखर आयुक्त कार्यालयात हरकत नोंदवणे बाबत तहसीलदार कार्यालयात निदर्शने देखील झालीत तहसीलदार अनिल गावित व पोलीस निरीक्षक अवतारसींग चव्हाण यांनी वरिष्ठांशी बोलून आपले म्हणणे कळवतो त्यासाठी काही वेळ द्यावा व आंदोलन थांबवावे अशी विनंती केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले,परंतु जर का सरकारने आपली भूमिका बदलली नाही तर मात्र मोठ्या प्रमाणावर आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.या वेळी एस बी पाटील,डॉ रवींद्र निकम,भागवत महाजन,अड हेमचंद्र पाटील,आत्माराम म्हाळके,प्रदीप पाटील,प्रकाश पाटील,हिम्मतराव पाटील,माधवराव पाटील,हेमराज पाटील,तुळशीराम पाटील,संतोष पाटील,कांतीलाल पाटील, प्रा प्रदीप पाटील,संभाजी पाटील,ऊर्वेश साळुंखे,अनिल वानखेडे,निलेश बारी,माधवराव करंदीकर,युवराज पाटील,चंद्रकांत पाटील,नारायण पाटील,रमेश सोनवणे,डॉ दिनकर पाटील,जितेंद्र पाटील,अनिल पाटील,किरण पाटील,संदीप पाटील,सोनवणे,अजित पाटील,पुंडलिक महाजन,डॉ रोहन पाटील,संजय बोरसे,अनिल पाटील,डॉ प्रकाश पाटील,डॉ किरण पाटील, गोपाल धनगर,प्रशांत पाटील,डॉ सुभाष देसाई,अमृत महाजन,आनंद पाटील,संदीप बोरसे यांचेसह असंख्य शेकडो शेतकरी हजर होते.











