राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली असून राज्यपालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचे म्हणत राज्यपालांची बाजू घेतली आहे.
मुंबईत पत्रकारांसोबत बोलताना ‘महाराष्ट्राचे हे एकमेव राज्यपाल आहेत जे महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकलेत. मराठी माणसांवर त्यांचे खूप प्रेम आहे. हे मी स्वत: अनुभवलं आहे. मात्र, अनेक वेळा त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो. यापूर्वीही असं अनेकदा घडलं आहे. मात्र, त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, हे निश्चित’, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यापालांची पाठराखण केली होती त्यानंतर विरोधकच चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच आता अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.











