देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

0
47
फोन टॅपिंगप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. चौकशी समितीनेही त्यांना दोषी ठरवले असताना त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न ईडी सरकार करत आहे. हे प्रकरण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री असतानाचे आहे. आताही तेच गृहमंत्री आहेत. फोन टॅपिंग प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.

लोकप्रतिनिधी, पत्रकार व अधिकारी यांची वेगळी नावे ठेवून त्यांचे फोन टॅप केले गेले. हा आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला आहे. फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी ब्लॅकमेलिंगची व्यवस्था केली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना रश्मी शुक्ला या आयपीएस अधिकाऱयावर गुन्हे दाखल झाले, त्यांची चौकशी झाली, रश्मी शुक्ला यांनी चूक झाल्याचेही मान्य केले होते, पण राज्यात ईडीचे सरकार येताच पह्न टॅपिंग प्रकरण दडपण्याचे काम केले जात आहे. पुणे पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला, परंतु न्यायालयाने ताशेरे ओढत अधिक चौकशीची गरज असल्याचे सांगितले. फोन टॅपिंग गंभीर गुन्हा असताना फडणवीस यांनी क्लीन चिट देण्याचा सपाटाच लावला होता आताही तोच प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Spread the love