नेमकं काय म्हणाले फडणवीस?
होते. मी त्यांना फोन करून सांगितलं होतं, की आम्हाला सरकार बनवायचे आहे आणि तुमची साथ हवी आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी कोणता आर्थिक व्यवहार केला, हे म्हणणं चुकीचं आहे. इतरांचं मला माहिती नाही. मात्र, बच्चू कडूंवर अशा प्रकारचे आरोप लावणं चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे जी लोक गुवाहाटीला गेली, ती पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन गेली”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“काल मी आणि मुख्यमंत्री एकनाद शिंदे यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्याशी चर्चा केली. दोघांनीही हे मान्य केलं की, जी वक्तव्य त्यांच्याकडून झाली, ती रागात झाली आणि ती योग्य नव्हती. मात्र, आता दोघांनीही ठरवलं आहे, की अशा प्रकारे आरोप करणं योग्य नाही. त्यामुळे हा विषय आत संपलेला आहे”, असेही ते म्हणाले.
दोघांमध्ये नेमका काय वाद?
गेल्या ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदार संघातील एका दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रवी राणांनी बच्चू कडू यांना डिवचलं होतं. ‘मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… हे या मतदार संघातल्या आमदाराचे ‘स्लोगन’ आहे,’ अशी टीका त्यांनी केली होती. त्याला प्रत्यूत्तर देताना बच्चू कडूंनी रवी राणांविषयी असंसदीय शब्दांचा वापर केला. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरू आहे.











