
तळोदा येथे सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा ,कृपासिंधू सेवाभावी संस्था तळोदा व कलाल समाज नवयुवक गणेश मंडळ संयुक्ताने दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी तळोदा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तळोदा- शहादा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजेश दादा पाडवी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.श्री.शशिकांतजी वाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री.अजय भैय्या परदेशी, तळोदा शहराध्यक्ष मा.श्री.योगेश भाऊ चौधरी कलाल समाजाचे अध्यक्ष श्री.संजू भाऊ कलाल,विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री मा.श्री.विजयराववजी सोनवणे, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.प्रदीप माळी हे मंचावर उपस्थित केले. प्रथम भारत माता पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला सुत्रसंचलन दिलीप गिरणार यांनी केले. यावेळेस मान्यवरांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रस्तावना सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठदान हे ब्रीदवाक्य खूप महत्त्वाचे आहेत रक्त हे कुठल्याही कंपनीत किंवा मशिनरीने तयार होऊ शकत नाही माणसाचे रक्त माणसाला उपयोगी येतं यामुळे आम्ही सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा,कृपासिंधू सेवाभावी संस्था व कलाल समाज नवयुवक गणेश मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्याचे योजना केली अशा प्रकारे समाज उपयोगी कार्यक्रम घ्यायचे असं ते म्हणालेत यामुळे आपण सर्वांनी रक्तदान करावे ही विनंती व आव्हान केले.
“रक्तदान हेच जीवनदान, हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढीमधला साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन तळोदा येथील सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा, कृपासिंधू सेवाभावी संस्था व कलाल समाज नवयुवक गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही बांधिलकीची भावना आपल्याच नेहमीच जागृत असली पाहिजे म्हणून समाजातील काही नवयुवक तरुणांनी हा स्तुत्य अशा उपक्रम रावबविण्याचे ठरविले. आणि म्हणून आज तळोदा येथील कलाल समाज वाडीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन गणपती गल्लीतील कलाल वाडी मध्ये करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण ३० दात्यांनी रक्तदान केले. यावेळी . या रक्तदानामध्ये महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यावेळी रक्तदान केलेल्या दात्यांना सप्रेम भेट म्हणूम घड्याळ प्रशस्ती पत्र देण्यात आले. नंदुरबार येथे रक्त साठवण केंद्र आहे त्या ठिकाणी हे रक्त ठेवण्यात येणार आहे.
आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण आपण वाचवू शकलो ही कल्पनाच निखळ समाधान देणारी आहे. रक्तदानामुळे रक्त तर शुद्ध होतेच शिवाय शरीरात नवीन रक्त तयार होण्याची क्रियेला चालना मिळते. रक्तदानाला केवळ 10 मिनिटांचा वेळ लागत असून 18 ते 60 वयोगटातील निरोगी व्यक्तीस वर्षातून 2 ते 3 वेळा रक्तदान करता येते. भविष्यात रक्तदात्याला किंवा त्याच्या नातेवाईकाला रक्ताची गरज भासल्यास या रक्तपेढी मार्फत रक्तपुरवठा करण्यात येत असतो.असे यावेळी डॉक्टरां कडून सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी तळोदा कलाल समाज पंच मंडळाचे अध्यक्ष संजय कलाल, उपाध्यक्ष महेंद्र कलाल, मनीष कलाल, दिलीप गिरनार, मनोज खैरनार, चेतन इंगळे, वासुदेव कलाल, कृपासिंधू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र भाऊ कलाल, सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे, जितेंद्र कलाल, प्रकाश कलाल, दीपक कलाल, जितेंद्र कलाल, यांसह समाजातील मान्यवर व समाज बांधव व नवयुवक मंडळाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन गणेश मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत गिरनार, सचिव धीरज कलाल, महेश कलाल, कमलेश कलाल,निलेश कलाल, गिरीश कलाल , चंद्रेश कलाल, अक्षय कलाल, यश कलाल,भूपेंद्र कलाल यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या आभार कलाल समाज नवयुग गणेश मंडळाचे अध्यक्ष आनंद कानडे केले.










