राज्यात 7 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्यबळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच 7 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी 7 हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.










