जळगाव प्रतिनिधी – तालुक्यातील मुमराबाद येथे जवळपास चार दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
याबाबात सविस्तर वृत्त असे की मुमराबाद गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी नांद्रा गावाला राष्ट्रीय पेयजल योजना राबवण्यात आली. नळ योजनेसाठी नदीवर विहरी आहेत व गावी चार पाण्याच्या टाक्या उभारलेल्या आहेत.
यात दोन टाक्या सरकारी दवाखान्या शेजारी आहेत एक टाकी उमा नगरला आहे. व एक टाकी खंडेराव नगर मध्ये आहे.परंतु गाव पुढार्यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे गावात होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची चर्चा ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहे.
तसेच गावात खंडेराव नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ, उमा नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ,त्याचप्रमाणे उपकेंद्राच्या मागील बाजूस असलेले व्हॉल उघडे असल्यामुळे घाण पाणी त्या व्हॉलमध्ये जाते व ते पाणी पाईपलाईनमध्ये जात असल्यामुळे नागरीकांच्या जिवाशी बेतणारा हा प्रकार सध्या सुरू आहे.नळातून येणार्या पाण्यात ब्लेचींग पावडरचा थोडाही वापर नसल्यामुळे पाण्याचा घाण वास येत आहे.
गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी नळांना तोट्या बसवलेल्या नसल्यामुळे त्या नळामध्ये गटारीचे घाण व दूषित पाणी जात असते.
या सर्व बाबीकडे गाव पुढारी दुर्लक्ष करत आहेत.
विशेष म्हणजे सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने गावामध्ये जवळपास चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद झाला आहे.पदाधिकाऱ्यांना नागरिकांनी याबाबत विचारपूस केली असता मोटर जळाली असल्याचे कारण सांगून टाळाटाळ करीत आहेत.
मागील काही महिन्यापूर्वी नांद्रा येथे चार पाणीपुरवठा करणारे पंप शिल्लक असल्याबाबतची माहिती देण्यात आली होती.त्यानंतर प्रशासकीय काळामध्ये एक नवीन पंप देखील खरेदी करण्यात आला होता.इतके पंप शिल्लक असताना देखील गावाचा पाणीपुरवठा बंद कसा असा प्रश्न देखील गावातील नागरिकांना पडलेला आहे.जर त्या पंपांपैकी एक किंवा दोन पंप शिल्लक राहिले असतील तर मग बाकी पंप कुठे गेले असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या गावात गाव पुढार्यांच्या दुर्लक्षामुळे जवळपास चार दिवसापासून पाणी आलेलं नाही.
या प्रकाराकडे गाव पुढाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन गावाला होणारा पाणी पुरवठा सुरळीत करुन होत असलेली गैरसोय थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











