दिल्लीतील श्रद्धा वालकर प्रकरणामुळे पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा चर्चेत आला आहे. अशा प्रकरणापासून मुलींना दूर ठेवण्यासाठी तसेच असं जर कोणती मुलगी करणार असेल तर तिला त्या पासून दूर ठेवण्यासाठी वादग्रस्त महाराज कालीचरण यांनी एक अजब उपाय सांगितला आहे. डुकराचा दात पाण्यात रात्रभर भिजत ठेवा व ते पाणी मुलीला प्यायला द्या. लगेच तिचे डोके ठिकाण्यावर येईल व तिच्यावर असलेलं प्रेमाचं भूत बाहेर येईस, असा अजब दावा कालिचरण यांनी केला आहे.
सकल हिंदू धर्माच्या वतीने नगरमध्ये लव्ह जिहाद कायद्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये कालीचरण महाराज आणि काजल दीदी हिंदुस्थानी हिंदुस्थानी सहभागी झाले होते. त्यावेळी कालीचरण महाराज यांनी हा दावा केला.
” डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मुस्लीमांवर विश्वास ठेवू नका. रोज 1 लाखाहून अधिक गायींच्या हत्या होतायत. सर्व आंतकवादी हे मुस्लीमच आहेत. जर सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पंतप्रधान झाले असते तर आज आपला देश हिंदू राष्ट्र असता” असे कालीचरण महाराजांनी सांगितले.











