खासगीकरणाच्या विरोधात विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात!

0
43

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – महाराष्ट्रातील विज ग्राहकांना शेतकऱ्यांना प्रकाशमान करण्याचे काम गेली अनेक वर्षं महावितरण कंपनीच्या माध्यमातून विज अभियंता अधिकारी व कर्मचारी करत आहेत राज्याच्या स्थापनेपासून अतिदुर्गम भागात तसेच दऱ्या खोऱ्यात विज पोहचवण्याचे काम विज कर्मचारी यांनी शासनाच्या माध्यमातून केलेले आहे . राज्य सरकारने वेळोवेळी कोट्यवधी रुपये खर्च करून लाखो ग्राहकांना रोहित्र पोल उपकेंद्र उभारणी करुन अखंडित वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवला आहे मात्र अलीकडे अदानी इलेक्ट्रिक कंपनीने राज्यातील महसुली दृष्टया अतीशय महत्त्वाचा असा ठाणे नवीमुंबई उरण पनवेल तळोजा विभागासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर परवान्यासाठी अर्ज दाखल केला आहे हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग देशामध्ये होत आहे जर असा परवाना देण्यात आला तर राज्याच्या विज उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम होतील आज विज ग्राहकांना देण्यात येणारा विजेचा दर विशेष करून शेतीपंप असेल दारिद्रय रेषेखालील ग्राहक असेल सार्वजनिक पथदिवे असतील इत्यादींना विज खरेदी दरापेक्षा कमी दराने वीज देण्यात येते व त्यासाठी उच्चदाब ग्राहक वाणिज्य ग्राहक उद्योग यांच्याकडून अधिकच्या भावाने विज क्राॅस सबसिडीच्या माध्यमातून वसूल केला.त्यामुळे महावितरण कंपनीला वर्षभरातून १२ हजार कोटी रुपये महसूल मिळत आहे त्यामुळे हजारो कोटींचा वाटा हा सबसिडीचा आहे त्यामुळे जर सदरचे ग्राहक हे महावितरण कडून भांडवलदारांकडे गेले तर उर्वरित विज ग्राहकांना विज दर वाढीचा मोठा फटका बसणार आहे त्यामुळे राज्यातील जनता व शेतकरी भविष्यात वाढीव विज दरामुळे वीज वापर करू शकणार नाही

त्याच बरोबर महापारेषण कंपनीतील विविध विभागांमध्ये महापारेषणच्या जाळ्याचा वापर करून खाजगी भांडवलधारांकडून खाजगी मालकीच्या वाहिन्या टाकण्याचे काम सध्या राज्यात सुरू आहे तसेच महानिर्मिती कंपनीतील स्वताच्या मालकीचे असलेले जलविद्युत प्रकल्प खाजगी तत्त्वावर चालविण्यासाठी प्रयत्न शासन दरबारी सुरू आहे या सर्वांचा परिणाम महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेवर होवू शकतो . त्यामुळे हा सर्व प्रकार जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी लवकरच संघटना आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले जात आहे.आता सध्या महावितरण चे अधिकारी व कर्मचारी गावोगावी लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन खाजगीकरण रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत .या निवेदनावर महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता संघर्ष समितीचे काॅ कृष्णा भोयर , अरुण पिवळ , संजय ठाकूर ,आर टी देवकांत ,सय्यद जहारोद्दीन ,राजन भानूशाली , दत्तात्रय गट्टे ,सुयोग झुटे ,संजय खाडे ,पी बी उके ,एस के लोखंडे , नचिकेत मोरे ,एम एस शरीकमसलत , राकेश जाधव , नवनाथ पवार , शिवाजी वायफळकर , उत्तम पारवे ,राजन शिंदे , दामोदर चंगोले , प्रविण वर्मा यांच्या स्वाक्षऱ्या असून हे निवेदन प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांना देण्यात येत आहे येथील विज वितरण चे अधिकारी व कर्मचारी यांनी सरपंच यांच्या कडे निवेदन दिले आहे.

Spread the love