एक दिवसासाठी CBI-ED माझ्याकडे सोपवा, अर्धा भाजप तुरुंगात जाईल; केजरीवालांचा हल्लाबोल

0
47

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाचं विधान करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. माझ्याकडे 24 तास सीबीआय आणि ईडीचे नियंत्रण दिले तर भाजपचे (भाजप) अर्ध्याहून अधिक नेते तुरुंगात जातील’, असे त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले की, भाजपकडे सीबीआय-ईडी आहे, इतके आरोप केले पण एकही सिद्ध झाला नाही. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या खटल्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यांच्याविरुद्ध काहीही सापडले नाही, अशी टीका त्यांनी एका टीव्ही मुलाखतीत केली.

एमसीडी निवडणुकीपूर्वी एका टीव्ही मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी एमसीडीला पाच वर्षांत एक लाख कोटी रुपये दिले, जे खाल्ले गेले. ते खाल्ले नसते तर कर्मचाऱ्यांना पगार मिळाला असता. त्यांची पचनशक्ती मजबूत आहे आणि ते सर्व पैसे खातात, असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला. भाजपने आपल्यावर कोणताही आरोप नसल्याचा दावा केल्यावर केजरीवाल म्हणाले, ‘सगळ्या तपास यंत्रणा त्यांच्यासोबत आहे, मला 24 तास सीबीआय आणि ईडी द्या, जर अर्धा भाजप तुरुंगात नसेल तर मला सांगा’.

केजरीवाल पुढे म्हणाले, ‘त्यांनी गुजरातमध्ये घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला पूल बांधण्याचे कंत्राट दिले आहे आणि केजरीवाल भ्रष्ट असल्याचे सांगतात. घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला टेंडरशिवाय पूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आल्याची घटना जगाच्या इतिहासात कधीच घडली नसेल, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया हे भ्रष्ट असल्याचे बोलले जात आहे. सीबीआय आणि ईडीला 24 तास एकदा द्या आणि मग बघा. त्यांच्याकडे सीबीआय-ईडी आहे, त्यांनी आमच्यावर इतके गुन्हे दाखल केले आहेत, एकही सिद्ध झाला आहे का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

Spread the love