भुसावळ – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील पंडीत नेहरू विद्यालय येथे गोजोरा , कंडारी येथून शालेय शिक्षणासाठी मुलं मुली एस टी बस ने ये – जा करतात मात्र दि २२ रोजी नेहमी प्रमाणे संध्याकाळी ५ वाजता शाळा सुटली असता गोजोरा येथील मुलांमुलींना घरी जाण्यासाठी असणारी एस टी न आल्याने गोजोरा येथील विद्यार्थी मुला मुलींना वराडसिम बस स्थानक वर संध्याकाळी ५ वाजे पासून ७ वाजेपर्यंत घरी जाण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना तात्कळत राहावे लागले त्यात आपले पाल्य घरी आले नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले.
शाळा सुरू होऊनही आठवडा झाला बहुतेक विध्यार्थीनी पासेस काढल्या आहेत पण ऐन वेळी एस टी न आल्याने पास कामा पडली नाही तसेच रिक्षा भाडे नसल्याने मुलं मुली बस स्थानकावर बसून होती ही बाब पंडीत नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक सुशीलकुमार खेडकर यांना समजल्यावर
त्यांनी ताबडतोब शाळेचे शिपाई आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांनां बस स्थानकावर पाठवून सर्व मुलामुलींना तीन ते चार रिक्षा करून गोजोरा गावाच्या विद्यार्थी मुलामुलींना दोन तीन तासा नंतर सुखरूपपणे घरी पोहचवून दिले .खरे पाहता शाळेची विद्यार्थ्या प्रति जबाबदारी ही शाळा पर्यंत मर्यादीत असते परंतु शाळा सुटल्यावरही आपले विद्यार्थी मुलंमुली सुखरूपपणे घरी पोहचले की नाही असे कुटुंबप्रमुखा प्रमाणे काळजी मुख्याध्यापक सुशीलकुमार खेडकर यांनी घेतल्याने त्यांचे पालकांनी अभिनंदन केले आहे.











